शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

Thursday, August 4, 2011

पाचवा वेद

'चार वेद केले बरमदेवानं अन् पाचव्या वेदाची वानी केली तुकोबा रायानं'
हे वचन आहे, आपल्या गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनातले. गाडगेबाबा तसा अंगठेबहाद्दर माणूस. कोण्या शाळेत गेला नाही. कोण्या विद्यापीठात शिकला नाही. पीएचडी केलं नाही. डी.लिट. मिळविली नाही. तथाकथित विद्वानही झाला नाही. पण त्यांनी तुकोबाच्या गाथेचे जे मूल्यमापन केले आणि फक्त दोनच शब्दात केले, त्याला जागतिक वाड्मयात तोड नाही. कोणते आहेत बरं ते दोन शब्द?
पाचवा वेद हे आहेत ते दोन शब्द ! तुकोबाची गाथा म्हणजे पाचवा वेद!
आपल्या महाराष्ट्रापासून तो रशियासारख्या महा-राष्ट्रातल्या अनेक विद्यापीठात तुकारामाच्या अभंगाचा अभ्यास झाला. त्यावर अनेक संशोधने झाली. कित्येक भाष्ये लिहिली गेली; पण त्या सर्वांना भारी आहेत, गाडगेबाबांचे दोनच शब्द-पाचवा वेद. तुकोबाची गाथा म्हणजे पाचवा वेद. गाडगेबाबासारखा निरक्षर संत तुकारामाच्या अक्षर वाड्मयाला पाचवा वेद का म्हणतो? हे जरा आपण समजून घेतले पाहिजे. ह्या पाचव्या वेदाअगोदरचे चार वेद कोणते?
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, हे चार वेद ब्रह्मदेवानं केले असे मानले जाते. हे सर्व वेद संस्कृत भाषेत आहेत. त्या काळी संस्कृत भाषेला देवाची भाषा-देववाणी म्हटली जात असे आणि काही मूठभर लोकांनाच ती लिहिता वाचता येत असे. त्यामुळे वेदान्ताचे ज्ञान साहजिकच समाजातील विशिष्ट लोकांपर्यंतच पोचायचे आणि संख्येने फार मोठा असलेला वर्ग त्या ज्ञानापासून वंचित राहायचा.
याविरुद्ध पहिले बंड पुकारले ते चक्रधरांनी. महानुभव पंथाचे ग्रंथ मराठीतून लिहिले गेले पाहिजे, असा त्यांचा आपल्या शिष्यांना आग्रहच होता. दुसरे बंड केले ते संत ज्ञानदेवांनी. संस्कृत भाषेत अडकलेल्या गीतेच्या तत्वज्ञानाला त्यांनी पहिल्यांदा जनसामान्यांच्या भाषेत आणले ते आपल्या ज्ञानेश्‍वरीत अठराव्या अध्यायात वेदांवर मार्मिक टीका करताना ज्ञानेश्‍वर म्हणतात..
वेदु संपन्न होय ठाई । परि कृपणु आन नाही ।
जे कानी लागला तिही । वर्णाचांचि ।।
वेद आपल्या जागी संपन्न म्हणजे ऐश्‍वर्यवान आहेत. समृद्ध आहेत. एकप्रकारे श्रीमंत आहेत परंतु त्यांच्यासारखे कृपण म्हणजेच कद्रू- कंजूष दुसरे कोणी नाही. कारण ते फक्त तीनच वर्णांच्या कानी लागतात, ते तीन वर्ण कोणते ? ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य. वेदपठणाचा अधिकार ब्राह्मणांना आणि ते ऐकण्याची सवलत क्षत्रिय आणि वैश्यांना. शूद्रांना ते ऐकण्याचीही उजागिरी नव्हती म्हणूनच ज्ञानेश्‍वर समाजाच्या बंदिस्त चौकटीविरुद्ध बंडाळी करतात आणि वेदांना 'कृपण' म्हणतात. कद्रू म्हणतात. कंजूष म्हणतात. ज्ञानेश्‍वरांच्या काळी 'कृपण' या शब्दाने काय हाहाकार माजविला असेल, याची कल्पना आपल्याला येऊ शकते.तेराव्या शतकातले ज्ञानेश्‍वर, सतराव्या शतकातले तुकाराम आणि विसाव्या शतकातले गाडगेबाबा हे तिघेही आपआपल्या काळातले थोर बंडखोरच होत. ज्या चौथ्या वर्णासाठी ज्ञानेश्‍वरांनी प्राकृत भाषेत ज्ञानेश्‍वरी सांगितली, त्याच चौथ्या वर्णाच्या लोकभाषेत तुकोबा आपले अभंग बोलले.
ज्ञानदेवे रचला पाया । तुका झालासे कळस ।।
ज्ञानदेवांनी बंडखोरीचा पाया रचला तर तुकोबांनी कळस गाठला. तुकोबाराय म्हणतात, शास्त्राचा अर्थ केवळ आम्हालाच ठाऊक आहे. म्हणजेच देवाचे खरे स्वरूप फक्त आम्हीच जाणतो. या आत्मविश्‍वासपूर्ण अभंगवाणीला गाडगेबाबा पाचवा वेद म्हणतात ते किती सार्थ आहे, हे आपल्याला पटते. जे भंगत नाही ते अभंग काळाच्या अखंड प्रवाहात तुकोबाचे बोल, तुकोबाची वाणी घट्ट पाय रोवून उभी आहे, म्हणूनच तर तिला आपण 'अभंग'वाणी

No comments:

Post a Comment